"वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा " , "दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा , अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त","ॐ भूर्भुवः स्वः तत्स॑वि॒तुर्वरेण्यं॒ भर्गो॑ दे॒वस्य॑ धीमहि धियो॒ योनः प्रचो॒दया॑त् "

Swaroop Foundation


सत्पुरुष !

“सत्पुरुष” म्हणजे अलौकिक व्यक्तीमत्व होय.आपल्या नश्वर मानवी देहाचे स्वरूप व नाते कळून आल्यामुळे ज्याची वृत्ती तदाकार म्हणजेब्रह्मरूप होते तो सत्पुरूष होय.अर्थात ही प्रक्रिया त्याच्या जन्मापासून सुरु होते.सत्पुरुष कोणत्याही ककारांच्या बंधनात सापडतनाही.किर्ती,पैसा,स्री,जागा,कुळ ( जात्याभिमान,धर्माभिमान ) , परद्वेष , परनिंदा,हिंसा,हिडिस राजकारण, स्वार्थीपणा यात तो अडकून रहात नाही. सत्पुरुषाच्या केवळ दर्शनानेच समस्या सुटू लागतात.व ईशभक्तीची प्रेरणा होऊ लागते.खरा सत्पुरुष ओळखणे अतिकठीण काम असते कारण तो एरवी सामान्य माणसासारखा आपली उपजीविका करीतअसतो.पण त्याच्या प्रत्येक कृतीमागे अहंभावाचा अभाव असतो. आपले अलौकिक स्वरूप उघड होऊ नये यासाठी तो अधिकाधिक जागरूक असतो. कारण अलौकिकत्व दिसले की उपाधींचा झपाटा आलाच हे त्याला पुरेपूर माहित असते. ते सर्वसामान्यासारखे वागण्याचा प्रयत्न करीत असतात. तरीही त्यांचे तेज कुठे ना कुठे तरी जाणवतेच.ते स्वतःहून कधीच चमत्कार करीत नसतात.त्यांच्यावर अनन्य श्रद्धा असलेल्या चाहत्यांना त्याच्या प्रत्येक कृतीत चमत्कार दिसून येतो.

सध्याप्रमाणे माघेही बिकट काळ अनेक वेळा प्राप्त झालेला होता.सत्पुरुषांचे कार्य त्यावेळीही चालू होतेच व आजही चालू आहेच. ज्याप्रमाणे विषारी सर्पाशी झगडताना विषबाधा झालेले मुंगुस झगडा चालू असतानाच मधेच पळुन जाते व शेतात जाऊन ठराविक वनस्पतीचा पाला खाऊन पुन्हा झगडा करावयास येते त्याप्रमाणे या आसक्ती व महामोह निर्माण करणाऱ्या संसाररुपी शत्रूशी झगडताना जीवाला मोह नष्ठ करणाऱ्या सत्पुरुष्याच्या सहवासाची आत्यंतिक आवश्यकता असते.ज्यांना हे मर्म कळले त्या व्यक्ती दिवसातून थोडा वेळ राखून ईशसेवा सत्पुरुषाराधन करीत असतानाच अर्थात हल्ली शिष्य “चित्तापहारक “ “सत्पुरुषापेक्षा “शिष्यवित्तापहारक “ भोंदू गुरु संख्येने अधिक झाल्यासारखे असे वाटते.

लोकसंखेच्या मानाने सत्पुरूषांच्या संख्येत वाढ होत असते पण त्यातील फारच थोडे सत्पुरुष प्रकट कार्य करीत असतात.प्रकट कार्य करणाऱ्या सत्पुरुषांची संख्या घटत चालल्यामुलेच “ सत्पुरुष दुर्मिळ होत चालले आहेत.” असे वाटते. असे अप्रकट सत्पुरूष शोधून त्यांची सेवा व सहवास घडणे ही परमार्थातील प्रगती होय. शिवाय सत्पुरुषाने जडदेह सोडला तरी तो सूक्ष्म रूपाने कार्यरत असतोच.

कित्येक महनीय सत्पुरुषाचे कार्य अद्यापही अविरत चालू आहे. जडदेहात असताना त्यांनी जितके कार्य केले त्याहून कितीतरी पटीने अधिक कार्य ते अवतार समाप्तीनंतर करीत असतात. तेंव्हा सध्याच्या बिकट परिस्तिथीत सत्पुरूष दुर्मिळ झालेले नसून सत्पुरुषाविषयीचा भक्तीभाव दुर्मिळ होत चालला आहे असे म्हंटल्यास जास्त सयुंक्तिक ठरणार आहे.शिवाय जो काही थोडा भक्तीभाव असतो तो या विज्ञानयुगात हास्यास्पद ठरतो.शिवाय तशातून शिल्लक राहिलेला भक्तीभाव ,सत्पुरुष व देव देवता यांच्या सहाय्याने प्रपंचातील अडचणी सोडविण्यासाठी व स्वार्थी मनोरथ पुर्ण करण्यासाठी खर्च होतो. म्हणून खरा भक्तिभावाच दुर्मिळ होत चालला आहे हे खरे. विशवकल्याणाकरिता ज्या वेळी ज्या दृष्टीकोनातून धर्म समजावला गेला पाहिजे त्याचे प्रात्यक्षिक दाखविण्यासाठी परमेश्वर तत्कालीन सत्पुरुष रुपात अवतरीत होतात.

चैतन्यघन परमात्मा जगताला मार्ग दर्शन करू इच्छीतो परुंतु तो तर निर्गुन,निराकार आहे. निर्गुन निराकार मार्गदर्शन कसे करणार ? म्हणून आत्मीय सत्पुरूष जणांच्या डोळ्यांनी तो आपली पाहण्याची हौस भागवतो.गुरुमुखी तो उपदेशामृत पाजतो.

...... डॉ. गुरुवर्य सत्पुरुष मिलिंदमहाराज .


“ आपण करावे , करवावे l आपण विवरावे व विवरावावे ll
आपण धरावे , धरवावे l सत्स्वरूप ज्ञानमार्गासी ll
“गुरुविणे अन्य दैवत नाही l
कल्पित देवा पुजू नको l
स्वानुभव सिद्धांत दत्ताचा l
ध्यानी धरी कधी विसरू नको ll “
“ गुरुविना ज्ञान नाही,ज्ञानाविना मुक्ती नाही l “
“चौदा मण्यांचे आहे हे ज्ञान l
माळ जपूनी लावा हो ध्यान ll “
पुस्तके –
१) मला भगवंत हवा.
२) बोध गुटिका
३) सत्संग
४) पिंडी ते ब्रह्मांडीं
५) पारमार्थिक शंका समाधान

....... डॉ. गुरुवर्य सत्पुरुष मिलिंदमहाराज

||लक्ष||
||लाभ||
१०
११

उपक्रम राबविणे –
१) हुंडा निर्मुलन
२) अंधश्रध्दा निर्मुलन
३) व्यसन मुक्ती
४) वैद्यकीय मदत, रुग्णालय सुविधा
५) सत्संग ( भारतभर , जगभर प्रचार करणे. )
६) आध्यात्मिक केंद्रे स्थापन
७)धर्मशाळा बांधणे
८) शाकाहारीचे महत्व
९) वृधास्रम बांधणे
१०) शिक्षणाची सोय उपलब्ध करणे
११) नैसर्गिक आपतीच्या वेळी मदत करणे
१२) शेती विषयक ज्ञान देणे
१३) वेद शाळा चालविणे
१४) भक्तनिवास बांधणे
१५) ग्रंथालय चालू करणे
१६) लघु उद्योग काढणे
१७) बचतगट सुरु करणे
१८) धार्मिक उत्सव साजरे करणे
१९) सार्वजनिक शिबिरे भरविणे
२०) प्रवचने,व्याखाने करणे
२१) भजनी मंडळी तयार करणे
२२) संस्कुत,ज्योतिष,योगा वर्ग चालविणे
२३) स्वच्छता मोहीम राबविणे
२४) सार्वजनिक विवाह योजना राबविणे
२५) तीर्थयात्रा काढणे
२६) शिष्य परिवार वाढविणे.
२७) तरुणांचा अध्यात्मिक सहभाग वाढविणे.

....... डॉ. गुरुवर्य सत्पुरुष मिलिंदमहाराज


The Swaroop Sampradaya
Akkalkot Niwasi Shree Swami Samarth

“This book attempts to showcase the life of the exalted masters of the Swaroop Sampradaya and gives a brief outlook of the tremendous humanitarian work undertaken by the followers of this sect for the spiritual and material upliftment of the common man”

Swaroop-Sampradaya

In our age-old Vedic-Aryan religion, based upon the standards set by the Vedas1, the institution of disciplic succession is of unique importance. Since time immemorial, India has witnessed the emergence of traditions of different sects and their decline too in the course of various times. Yet there were some, which besides standing the tests of time rose to fame, lasted and gained recognition because of manifestation in them of some eminent personages endowed with divine splendour and they also appeared before the world in their renewed form.

The Swaroop – Sampradaya2, a sect that follows the Advaita3 philosophy and the philosophy of meditation, has come from the divine Preceptor Adinath Bhagwan Shankar4. It was when Lord Dattatreya, manifested Himself in the form of Shree Swami Samarth in its sub-sect called 'Saraswati', that the sub-sect came to be more popularly known as Shree Datta Sampradaya.

1 Vedas - Holiest Hindu scriptures
2 Swaroop Sampradaya - A sect wherein the aspirant concentrates on viewing the 'Atman' –the soul.
3 Advaita - The doctrine of the identity of the human soul or the universe and the divine essence
4 Adinath Bhagwan Shankar - Lord Shankar

...... डॉ. गुरुवर्य सत्पुरुष मिलिंदमहाराज .